समीर वानखेडेंचा पाय खोलात

आणखी एक पंच फुटला
मुंबई | प्रतिनिधी |
एनसीबीच्या कारवाईवरुन वादात सापडलेले समीर वानखेडे यांचा पाय गोत्यात सापडला असून,राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी पुराव्यासह अनेक गौप्यस्फोट केल्याने वानखेडे यांच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.दरम्यान,या सार्‍या पार्श्‍वभूमीवर समीर वानखेडेंना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे.
एनसीबीच्या खारघरमधील कारवाईच्या वेळी 10 ते 12 कोर्‍या कागदावर सह्या घेतल्याचा दावा नायजेरियन नागरिकाच्या अटकेतील कारवाईतील पंच शेखर कांबळे यांनी केला आहे. खारघरमध्ये नायजेरियन नागरिकाला अटक झाली होती. यामध्ये पंच असलेले शेखर कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध आहेत. तसेच क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया त्याच्या गर्लफ्रेंडसह उपस्थित होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. खेळ संपला पण खेळाडू अद्याप मोकाट आहे,
नबाब मलिक,राष्ट्रवादी प्रवक्ते

आर्यन खानच्या जामीनावर आज सुनावणी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी सुरु होती. आर्यनतर्फे युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आता अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना हे हजर होते. अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला असून एनसीबीचा युक्तिवाद उद्या होणार आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर गुरुवारी दुपारी घेण्यात येणार आहे.

खेतले करणार चौकशी
एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाचे अधिकारी मिलिंद खेतले यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी वानखेडेंविरोधात कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही.

Exit mobile version