समीर वानखेडे यांची बदली

मुंबई | प्रतिनिधी |
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर वादात सापडलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आता केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली करण्यात आलेली आहे.वानखेडेंचा एनसीबीतील कार्यकाळ येत्या 31 डिसेंबर रोजी संपलेला होता.त्यांना ऑगस्ट 2021 पर्यंत संचालकपदी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा एनसीबीने मुदतवाढीचा आदेश काढत वानखेडे यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत चार महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. मात्र क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर वानखेडे आरोपांच्या फेर्‍यात अडकले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु, आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडे यांची बदली ही केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात करण्यात आली आहे.

Exit mobile version