समीर वानखेडेंची दोन तास झाडाझडती

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दिल्लीतील मुख्यालयात जवळपास 2 ताच चौकशी झाली. दिल्लीतील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
क्रूझवरील अंमली पदार्थाच्या छाप्या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांना 8 कोटी देण्यात येणार होते, अशा आरोप या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केला आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी समीर वानखेडे यांची ही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, आपण कोणालाही चौकशीसाठी बोलावलेलं नाही. समीर वानखेडेंची चौकशी करायची असती तर त्यांना आपण बोलावलं असतं, असं एनसीबीचे उपमहासंचालक ग्यानेश्‍वर सिंह यांनी सांगितलं.

समीर हे निर्दोष आहे. मला या प्रकरणाचा खूप त्रास झाला. आम्हाला ट्रोलिंग केले जात आहे. आम्हाला लटकवून टाकतील याची वाटते भीती, आम्हाला मारण्याची धमकी मिळते आहे अनेकांना समीर वानखेड़े नको आहेत. त्याचे कारणही सगळ्यांना माहिती आहे.
क्रांती रेडकर,अभिनेत्री

वानखेडेवर गुन्हा
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करत एका वकिलाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोप वानखेडेंवर करण्यात आला आहे. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, वकील सुधा द्विवेदी यांनी एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तसेच सह पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंभे आणि राज्य लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या कार्यालयात लेखी तक्रार सादर केली.

आर्यन खानला जामीन नाही
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यनचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि स्पेशल एनडीपीएस कोर्टाने फेटाळला आहे. त्यानंतर आर्यनचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयासमोर उत्तर दाखल केले आहे. आतापर्यंतच्या तपासात आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे असे एनसीबीने आपल्या असे उत्तरात म्हटले आहे. त्याची चौकशी केली जात आहे आणि प्रोटोकॉलनुसार आम्हाला योग्यरित्या शोधण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे असे उत्तर एनसीबीने हायकोर्टात दिले आहे.

Exit mobile version