शिक्षक समितीच्या तालुका अध्यक्षपदी समीर येरुणकर

नेरळ | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कर्जत त्रैवार्षिक अधिवेशनमध्ये सन 2021-22ची कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. यावेळी आदर्श शिक्षक समीर येरुणकर यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
किरवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अधिवेशनाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यावरून समितीचे जिल्हा सचिव नागोठकर आणि अधिवेशनसाठी निरीक्षक म्हणून भालेकर, गायकर, येळवे, पवार, संदीप भोईर,साळवी यांच्यासह तालुक्यातील केंद्रप्रमुख अंकुश पाटील, अरुण पारधी, शरद म्हसे, दरवडा आणि नलिनी साळोखे आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस नागोटकर यांनी शिक्षक समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून समीर येरुणकर, तालुका सचिव म्हणून सचिव येंदे, तर सहसचिव आशिष उंबरे यांची निवड झाली असून, संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर बुरुड आणि कोषाध्यक्ष संजय पानपाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

Exit mobile version