उरण पंचायत समितीच्या सभापती पदी शेकापच्या समिधा म्हात्रे यांची निवड

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शेकापच्या आवरे गणाच्या सदस्या समिधा निलेश म्हात्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित सभापती समिधा निलेश म्हात्रे यांचे मोठ्या उत्साहात मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, उरण पंचायत समितीचे मा.सभापती नरेश घरत,मा.सभापती काशिनाथ पाटील अँड सागर कडू, उपसभापती शुभांगी पाटील यांनी अभिनंदन केले.
उरण पंचायत समितीत आठ सदस्य संख्या असून यामध्ये शेकापचे पाच,शिवसेनेचे दोन आणि भाजपाचा एक सदस्य आहे.उरण पंचायत समितीचे सभापती अँड सागर कडू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या उरण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सोमवारी ( दि20) निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एन एन गाडे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी समिधा म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी उरणच्या सभापती पदासाठी समिधा म्हात्रे या निवडून आल्याचे घोषित केले.
माजी आमदार विवेक पाटील याचे अत्यंत जवळचे, विश्‍वासू सहकारी निलेश म्हात्रे यांच्या पत्नी तथा उरण पंचायत समितीच्या सदस्या समिधा म्हात्रे यांची सभापती पदी वर्णी लागल्याने नवनिर्वाचित सभापती समिधा म्हात्रे यांचे उपसभापती शुभांगी सुरेश पाटील,उरण पंचायत समितीचे सदस्या वैशाली पाटील,दिक्षा पाटील, दिपक ठाकूर,हिराजी घरत,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,माजी सभापती काशिनाथ पाटील, शेकापच्या माधुरी गोसावी, शेकापचे चिटणीस मेघनाथ तांडेल, नगरसेविका प्रितीजाँज म्हात्रे, जासई सरपंच संतोष घरत, युवा संघटना नेते रमाकांत पाटील, चंद्रकांत पाटील, बाबूराव पालकर,संदिप गावंड, सुरेश पाटील,जीवन म्हात्रे, नरेंद्र मुंबईकर सह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Exit mobile version