बुद्धिबळ स्पर्धेत समृद्धी झोरेची नेत्रदीपक कामगिरी

| माथेरान | वार्ताहर |

महाराष्ट्र शासनाच्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला कर्जत अभिनव ज्ञान मंदिर येथे प्रारंभ झाला. माथेरानच्या प्रा. शांताराम गव्हाणकर शाळेच्या समृद्धी सुरेश झोरे हिने नेत्रदीपक खेळ करत चार सामन्यांत विजय मिळवल्याने ती जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

6 सप्टेंबर रोजी कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर येथे रायगड जिल्हा परिषद क्रीडा विभागाकडून कर्जत तालुका बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटात समृद्धी सुरेश झोरे या विद्यार्थिनीने सलग चार सामने जिंकले. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे ती जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पात्र ठरली आहे.तिच्या यशस्वी भरारीने शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे. समृद्धीला शाळेचे शिक्षक संघपाल वाठोरे व निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी प्रशिक्षण दिले आहे. याबाबत पालकही समाधानी असून, पाल्याच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहून सर्व शिक्षकांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version