संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे उद्या मुंबईत आयोजन

शहीद शेतकर्‍यांना मान्यवरांची आदरांजली
| मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व डावे-पुरोगामी पक्ष-संघटनांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर 28 नोव्हेंबरला संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महापंचायतीच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्‍यांना अभिवादन करण्यासाठी या शहिदांचे अस्थिकलश संपूर्ण राज्यभर मानवंदना देणेकरिता फिरवण्यात येणार आहे. हे सर्व अस्थिकलश शनिवारी (27 नोव्हेंबर) छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा (शिवाजी पार्क, दादर), मुंबई या ठिकाणी दुपारी 12 वाजता एकत्रित आणले गेले. छत्रपतींच्या पुतळयासमोर या अस्थिकलशांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हे अस्थिकलश घेऊन वाहनजत्था अनुक्रमे चैत्यभूमी (दादर), हुतात्मा बाबू गेनूंचा पुतळा (परळ), आणि सायं.4 वाजता मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचे पुतळयांसमोर मानवंदना दिल्यानंतर अस्थिकलशांना मानवंदना देण्यात आली.

शहीद कलश शेकाप कार्यालयात
शहीद शेतकर्‍यांचे अस्थिकलश शनिवारी रात्री भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात ठेवण्यात आले होते. रविवारी(28 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता आझाद मैदान, मुंबई येथील ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीच्या सभा मंडपात आणले जाणार आहेत. या संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीसाठी ङ्गसंयुक्त किसान मोर्चाफ चे राकेश टिकैत, डॉ.दर्शन पाल, युध्दवीर सिंह, हनान मोल्ला, अतुलकुमार अंजान, राजाराम सिंह, आदि राष्ट्रीय किसान नेते उपस्थित राहणार आहेत.

शेकापचे पाच हजार कार्यकर्ते सहभागी
लखिमपूर खेरीच्या शहीद शेतकर्‍यांच्या अस्थिकलशांना मानवंदना देण्यासाठी 27 नोव्हेंबर तसेच रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महापंचायतीला राज्यभरातून शेतकरी कामगार पक्ष मोठया संख्येने सहभागी होणार असून एकटया रायगड जिल्ह्यातून 5 हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.

Exit mobile version