राज्यातील वाळू लिलाव बंद; महसूल मंत्र्यांची घोषणा

| पुणे | प्रतिनिधी |

वाळू उद्योगामुळे मुठभर लोक धनदांडगे झाले पण यामुळे नद्या, किनारे आणि शेतकरी उदध्वस्त झाला आहे. यासाठी सरकारने वाळू लिलाव कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. त्यासाठी लवकरच स्वतंत्र धोरण जाहीर करु,अ सेही त्यांनी सुचित केले.

नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव 2023, पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन व पिक परिसंवादाचे उदघाटन, विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे शेतकरी, कृषी सहाय्यक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी गेल्या काही वर्षात एनजीटीमुळे वाळू लिलाव बंद आहेत. तरी देखील प्रचंड प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन केले जाते. ही चोरी रोखण्यासाठी महसूल, पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्यावर वाळू माफियांकडून हल्ले होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. यासाठी वाळू लिलावच बंद केला तर असे प्रसंग निर्माण होणार नाहीत, असे ते म्हणाले. वाळू लिलावाबरोबर खाणकाम आणि क्रशरचे देखील नवे धोरण तयार करण्याचे सुतोवाच विखे पाटील यांनी केेल.

Exit mobile version