वासांबे जि.प. गटात संदीप मुंढे चर्चेत

| आपटा | प्रतिनिधी |

वासांबे जिल्हा परिषद गट क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ निशाणीवर संदीप सुदाम मुंढे निवडणूक लढवत असून, त्यांना शेकाप, मनसे, शरद पवार गट व काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे. गेली 28 वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुंढे यांनी मोहपाडा ग्रामपंचायतीत विविध पदांवर काम करत स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्क निर्माण केला आहे.

कोरोना काळात मोफत लसीकरण, सॅनिटायझर फवारणी, अन्नधान्य वाटप, तसेच आदिवासी व कामगार बांधवांना मदत केल्याने त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. परिसरात स्ट्रीट लाईट, हायमॅक्स व सोलर पथदिवे बसविणे, तसेच नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करून 6700 रुग्णांची तपासणी व 1350 मोतीबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याने त्यांचे काम चर्चेत आहे. भाजपच्या नेहा पारंगे यांच्याविरुद्ध मुंढे यांची लढत रंगतदार ठरणार असून, त्यांच्या कामाच्या जोरावर विजय मिळेल, अशी चर्चा मतदारसंघात आहे.

Exit mobile version