तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत साने गुरुजी विद्यालयाची बाजी

| महाड | प्रतिनिधी |

शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या पावसाळी क्रीडा स्पर्धा गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे प्रशासनाला घेता आल्या नाही. मात्र, यंदा पावसाळी क्रीडा स्पर्धा विलंबाने घेण्यात आल्या. पोलादपूर तालुका शासकीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच साने गुरुजी विद्यालय, लोहारे ता. पोलादपूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सहयोग प्रतिष्ठान संचालित साने गुरुजी विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करीत बाजी मारली.

14 वर्ष वयोगटात खो-खोमध्ये मुलींच्या संघाने द्वितीय, तर 17 वर्ष वयोगटात मुलांनी 4×100 रिले प्रथम क्रमांक पटकाविला. यश हाटे-100 मी. धावणे प्रथम क्रमांक, उंच उडी- विनय शिंदे द्वितीय, आर्यन पार्टेने तृतीय क्रमांक पटकाविला.

17 वर्ष वयोगट मुली कस्तुरी पवार- थाळी फेक प्रथम क्रमांक, लांब उड्डी- रिद्धी चिंचघरकर प्रथम क्रमांक, उंच उड्डी- सानिका सुतार प्रथम क्रमांक, साधना पवार-द्वितीय क्रमांक प्राप्त करून जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये प्रवेश प्राप्त केला आहे. त्याचबरोबर तीन हजार मी. धावणे- शिवानी दडस प्रथम क्रमांक व तनिषा निकम द्वितीय क्रमांक व 1500 मी धावणे- संस्कृती शेडगे द्वितीय, तर सृष्टी सोनावणे तृतीय क्रमांक. तर 800 मी धावणे स्पर्धेमध्ये चिंचघरकर तृतीय क्रमांक, 600 मी. धावणे भक्ती वायकर तृतीय तसेच 400 मी. धावणे साधना पवारने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

याप्रसंगी सहयोग प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकरी, विश्‍वस्त, सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या.

Exit mobile version