| खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील सांगडे गावाजवळ दिवसाआड लावल्या जात असलेल्या वणव्यामुळे संपुर्ण गावामध्ये भितीदायक वातावरण पसरले आहे. उन्हाळी हंगामात जंगलभागात सर्रासपणे वणवे लावले जातात. हा भाग डोंगरी विभागात येत असल्याने बहुतांश गावे ही डोंगराच्या पायथ्याशी वसली आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात लावल्या जाणार्या वणव्यांची झळ ही या गावांना बसत आहे. येथे दिवसाआड लावल्या जाणार्या वणव्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. जंगल भागातील वणवे हे लोकवस्तीजवळ येत असल्याने एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
वणव्यामुळे जंगल संपत्तीचा र्हास होत आहे. याशिवाय लोकवस्तीजवळ लावल्या जाणार्या वणव्यांमुळेही मोठी हानी होत असल्याने याबाबत संबंधितांनी लक्ष पुरवून योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. – महेश तुपकर, पर्यावरणप्रेमी