| संगमेश्वर | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना कोणतीही सुरक्षा घेतली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे, तसेच या अपघातप्रवण क्षेत्रात वाहनांचे अपघातही घडत असून प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी मोर्या आणि इतर बांधकामांचे काम रखडले आहे. धोकादायक ठिकाणी मोठे खड्डे काढून काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे मोठे अपघात घडत आहेत. चौपदरीकरणाचे काम करत असताना महामार्गावर धावणार्या वाहनांची सुरक्षा घेणे आवश्यक असते; मात्र ठेकेदार कंपनीकडून अशा कोणत्या प्रकारची यंत्रणा उभी केली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांची देखरेख असणे आवश्यक असते; मात्र अशी देखरेख या ठिकाणी होत नसल्याने चौपदरीकरणाला कोणी वाली नसल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसून येत आहे.







