किहीम आदिवासीवाडीत स्वच्छता अभियान

। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासीवाडी येथे पावसाळ्यात परिसरातील कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरून ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता आदिवासीवाडी येथील कचर्‍याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन दी लाईफ फाऊंडेशन द्वारा स्वच्छता अभियानांतर्गत श्रमदानाचा कार्यक्रम दि.18 जून रोजी सकाळी आठ वाजता आयोजित केला होता.

यावेळी ग्रामस्थ, दी लाईफ फाउंडेशनचे सदस्य, रा.जि.प. शाळा किहीमख्े मुख्याध्यापक सुनील माळवी व शिक्षिका चेतना थळकर तसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी किहीम ग्रामपंचायत सरपंच सीमा थळे, ग्रामसेवक निलेश तेलंगे तसेच ग्रामपंचायत सदस्या नूतन साळुंखे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कचरा गोळा करून नेण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. या श्रमदानाच्या कार्यक्रमात समाजसेवक विशाल मुरकर आणि प्रशांत नार्वेकर यांनी जेसीबी मशीनची व्यवस्था करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

Exit mobile version