। पाताळगंगा । वार्ताहर ।
मानवी मृत्यू नंतरचे चिरस्थान म्हणजे स्मशानभूमी, मात्र याकडे सरासपणे दुर्लक्ष केले जात असते. पाताळगंगा नदिच्या ठिकाणी असलेली माजगांव येथिल स्मशानभूमत पावसाळ्यात सर्वत्र ठिकाणी गवत वाढून सुकून गेले होते. त्याचबरोबर या स्मशानभूमीच्या सभोवताली झाडी, झुडपी तसेच कचरा पडला होता. येथिल तरुणवर्ग, ग्रामस्थांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन हा परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्मशानभूमी स्वच्छता अभियान हा उपक्रम येथील तरुणवर्गांनी हाती घेतला. यावेळी या ठिकाणी असलेली पायरी तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे ती बांधण्यात आली. तसेच तरूण हातात झाडू, घमेले, खुरपणे फावडे असे विविध साहित्य हातात घेवून स्वच्छता करण्यास मग्न झाले होते. तरुणवर्ग एकत्र आल्यास गावाचा विकास होत असतोच, त्याच बरोबर गावाचे गावपण टिकून राहते. कोणत्याही प्रकारची आशा मनात न बाळगता ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबविण्यात आली. यावेळी या मोहीमेस कार्यकर्ते, ग्रामस्थ, तरुणवर्गाचा समावेश होता.