| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत जोरदार स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ रस्ता व मुख्य बाजारपेठ या भागांत हे अभियान राबविण्यात आले.
अभियानांतर्गत 2.5 कि.मी रस्त्याची साफसफाई करण्यात आली. तसेच 1 कि.मी. लांबीचे गटार मनुष्यबळ आणि सक्शन मशीनने साफ करण्यात आले. या सफाई मोहिमेत सुमारे 4 टन कचरा ट्रॅक्टरचे सहाय्याने उचलण्यात आला. रस्त्याच्या बाजूला नाल्यांवर ढाबे बसवून कव्हर करण्यात आले आहेत. तसेच तुटलेल्या गटारांची दुरुस्तीही करण्यात आली. रस्त्यात असणारे धोकादायक पोल, बंद पडलेल्या वायर्स कापून रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्याही छाटण्यात आल्या. साफ केलेल्या जागी सुशोभीकरणासाठी रोपांच्या कुंड्या बसविण्यात आल्या. या अभियानात सुमारे 80 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.