विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

लहान वयापासूनच स्वच्छतेचे संस्कार मुलांच्या उमलत्या मनावर रुजविण्यासाठी शालेय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांपर्यंत कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेचे महत्व पोहचावे व दररोज नियमित वर्गीकरण कऱण्याविषयी पाल्यांमार्फत त्यांना सांगितले जावे यादृष्टीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. नवी मुंबईत अशाच प्रकारचा शालेय स्तरावरील ‘ड्राय वेस्ट बँक’ नावाच्या उपक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील 57 विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील सुका कचरा वेगळा ठेवण्याची सवय लागावी. तसेच कचरा वर्गीकरणाचे महत्व स्वकृतीतून पटावे यादृष्टीने त्यांनी प्लास्टिक बॉटल, चीप्स अथवा चॉकलेटचे कव्हर, टेट्रापॅक अथवा टिन, काचेच्या बाटल्या, घरगुती प्लास्टिक आठवड्यातून एक दिवस शाळेत जमा करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत त्यांनी जितक्या प्रमाणात या वस्तू जमा केल्या त्या प्रमाणात त्यांना पॉईंट्स देण्यात येत असून ते पॉईंट्स नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ड्राय वेस्ट पासबुक’ देण्यात आलेले आहे. या पासबुकमध्ये वर्गशिक्षकांमार्फत त्यांनी जमा केलेल्या सुक्या कचर्‍याच्या प्रमाणात देण्यात येणारे पॉईंट्स नोंदवून ठेवण्यात येत आहेत. प्रत्येक 100, 200, 500 पॉईंट्स जमा झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त पॉईंट्स मिळविणार्‍या महापालिका शाळा क्र. 3 आग्रोळी येथील 34 विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या पॉईंट्सच्या प्रमाणात वही, पेन, कंपासपेटी, अशा प्रकारच्या शालोपयोगी वस्तू देण्यात आलेल्या आहेत.

Exit mobile version