। अलिबाग । वार्ताहर ।
स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग या अभियानांतर्गत अलिबाग नगरपरिषद व ईकोसत्व ईन्व्हारमेंटल सोल्युशन प्रा.लि आणि व्हीडीके फॅसिलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच द.इंक्युबेशन नेटवर्क व सेकंड म्युस यांच्या सहकार्याने मुख्यधिकारी अंगाई साळुंखे यांच्या मार्गदर्शनखाली अलिबाग शहरामध्ये आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे. गुरुवारी नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये स्वच्छता प्रिमियर लिग लॉचिंग कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सर्व उपस्थितांचे प्रकल्प प्रमुख संतोष यांनी स्वागत केले व इकोसत्व प्रतिनिधी मल्हारी पंडीत यांनी स्वच्छता गीत सादर केले. तसेच शहरामधील नागरिकांनी होम कंपोस्टिंग कशा प्रकारे केले आहे हे इकोसत्व प्रतिनिधी रेश्मा ढावरे यांनी पिपीटीद्वारे माहिती सादर केली. त्यानंतर केक कापून मुख्यधिकारी अंगाई साळुंखे यांच्या हस्ते कंपोस्टिंग करणार्या नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्वच्छता प्रिमिअर लिगची संतोष राखेमल्लू इकोसत्व प्रकल्प प्रमुख व नदीम खान यांनी सविस्तर माहिती दिली व स्वच्छता प्रिमिअर लिग सर्वेक्षणामध्ये कोणत्या कामाला किती गुण आहेत व असेसमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टीवर किती मार्क आहे याबाबत सांगितले
यावेळी कंपोस्टिंग करणारे नागरिक, नगर परिषदेचे सिनियर क्लार्क जाधव, सुपरवाइजर तांबे, व्हिडीके ऑपरेशन मॅनेजर विकास कदम, सुपरवाइजर प्रथमेश गोरे, विकास ढगे, मल्हारी पंडित, राहुल तांबे, रेश्मा ढावरे, पूजा पिंगळे, नैना ढोरे व न.प.कर्मचारी व्हिडिकेचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
अलिबाग नगरपरिषदमध्ये स्वच्छता प्रिमियर लिग
