| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात नागरपरिषदेकडून स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मी यांचा पालिकेच्यावतीने स्वच्छता पंधरवडा समारोपाच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कर्जत नगरपरिषदेने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला. या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत कर्जत नगरपरिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेचे पुरस्कर्ते महात्मा गांधी यांची जयंती आणि स्वच्छता ही सेवा या स्वच्छता पंधरवडाचे समारोप कार्यक्रमाचे आयोजन पालिका कार्यालयात करण्यात आले होते. कर्जत नगरपरिषद कडून शहरातील सर्व भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणारे स्वच्छता कर्मी यांचा सन्मान पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्यावतीने करण्यात आला.
यावेळी कर्जत नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख सुनील लाड, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक रुपेश भोईर, शहर समन्वयक प्रशांत इंगळे आदी उपस्थित होते.