सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा संजय पडते

|वैभववाडी | प्रतिनिधी |
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विकासकामांची गती वाढली आहे. विकासाचा झंझावात कायम राहण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर देखील शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी येथे केले.
येथील शिवसेना संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला आघाडी प्रमुख निकम पालव, लक्ष्मण रावराणे, अंबाजी हुंबे, नलिनी पाटील, रवींद्र रावराणे, प्रदीप रावराणे, सुनील रावराणे, स्वप्निल धुरी आदी उपस्थित होते.
पडते म्हणाले, ङ्गमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जनतेला अपेक्षित विकासकामे करीत आहेत. प्रत्येक गावातील रस्ते, पाणी, साकव यासह विविध मूलभूत विकासाची कामे मार्गी लागत आहे. दोन वर्षात कित्येक कामे पूर्णत्वास गेली आहेत. तसेच अनेक कामे प्रस्तावित आहेत. ती पूर्ण येत्या काही दिवसांत पूर्ण होतील. विकासाची घोडदौड कायम राहण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच प्रत्येक कार्यकर्त्याने भगवा फडविण्यासाठी निर्धार करावा.फरावराणे म्हणाले, ङ्गशिवसेनेचे कोकणावर प्रेम आहे. हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकणला भरभरून दिले आहे. मेडिकल कॉलेज, ङ्गतौक्तेफसाठी भरघोस भरपाई अशी अनेक उदाहरणे आहेत.फ उमेदवारीबाबत चाचपणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 26 आणि 27 मार्चला शिवसेनेचे नेते मतदारसंघनिहाय दौरा करणार आहेत. या दौर्‍यादरम्यान ते सर्व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघाचे उमेदवार निश्‍चित केले जाणार आहेत.
पक्षप्रवेश 27 मार्चनंतरतालुक्यातील विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. येत्या 27 मार्चनंतर त्यांचे प्रवेश होणार असल्याची माहिती पडते यांनी दिली. नगरपंचायतीवर अकुंश ठेवण्याचे कामही शिवसेनेचे नगरसेवक करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version