| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी-कोलाड येथील छत्रपती शिवाजी नगर वसाहत अध्यक्षपदी संजय महाबळे यांची दुसर्यांदा निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी नगर वसाहत यांच्या संपन्न झालेल्या जनरल सभेत ही निवड करण्यात आली आहे.
तर कार्याध्यक्षपदी राकेश लोखंडे, उपाध्यक्ष श्री. मुलानी, सचिव सुनील ठाकूर व किसन ठाकूर तर खजिनदारपदी श्री. अंधेरे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी सल्लागार भाऊ वायकर, रोशन पानसरे, नारायण कडव, वामन कदम, महादेव जवरत, चंद्रकांत मुजरे, दिलीप पाबरेकर, निलेश महाबळे, मंदार विध्वांस, रमेश शिर्के, मनू परदेसी आदी सदस्य उपस्थित होते.