संजय पांडेंची लोकसभेतून माघार

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. संजय पांडे मुंबई उत्तर मध्य येथून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. स्थानिकांच्या आग्रहाखातर संजय पांडे निवडणूक लढवणार होते. मात्र, त्यांनी या निवडणूकीतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महायुतीकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकिट देण्यात आलं आहे. अशातच मुंबई पोलिस दलाचे माजी आयुक्त संजय पांडे देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आधिकारी आहेत. डीजी होमगार्ड, पोलीस महासंचालक, मुंबईचे आयुक्त म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावलेलं आहे. स्थानिकांनी संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केल्याने उत्तर मध्य मुंबईतून तिरंगी तढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.मात्र वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Exit mobile version