। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे हे घाबरलेले, लाचार व्यक्ती आहेत. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार तरी निवडून आणणून दाखवावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
पुण्यात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांना लोहपुरूष असल्याची उपमा दिली. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की,
एकनाथ शिंदे एक डरा हुआ आदमी, लोहपुरूष कोण अमित शहा? मग बाळासाहेब ठाकरे कोण? लाचार आहेत हे सगळे, घाबरलेले आहेत. खरी शिवसेना कोणती खोटी कोणती हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा कळेल. आज दहशत दबाव, पैशाची ताकद आणि निवडणूक आयोग त्यांच्या हातात आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावेत. इतकंच काय त्यांनी चोरलेले चिन्ह परत द्यावे आणि नवीन चिन्हावर निवडणूक लढून दाखवावी. तसेच, बाळासाहेबांच्या घरात चोऱ्या माऱ्या करता आणि अमित शहांची दादागिरी दाखवता. अमित शहा आणि मोदी हे अमृत पिऊन नाही आले कधी ना कधी जायचंच आहे, त्यावेळी जनता निर्णय घेईल की कोण खरे आहे आणि कोण खोटे आहे, असे म्हणत राऊत यांनी शिंदेंना आव्हान दिले आहे.
शिंदेंनी स्वत:चा पक्ष स्थापन करून फक्त…; संजय राऊत यांचे आव्हान
