। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्याला दम दिल्याचा प्रकार समोर आला आहे. झेंडा उंचावून घोषणा देणार्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला शिरसाटांनी मस्ती आली का? एका मिनिटात गायब करेन, अशा शब्दात धमकी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा भागामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचा बूथ समोरासमोर होते. आमदार संजय शिरसाट बूथवर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी समोर असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीदेखील झेंडा उंचावत घोषणा दिल्या. यावेळी संजय शिरसाट ठाकरे गटाच्या बूथवर गेले आणि त्यांनी कार्यकर्त्याला मस्ती आली का? एका मिनिटात गायब करेन, असं म्हणत दम दिला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला असून तो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी
