खारेपाट श्री 2022 चा संजय उले मानकरी

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
| अलिबाग | प्रतिनिधी |

बेलपाडा, ता.अलिबाग येथे जय हनुमान व्यायामशाळा यांच्यावतीने खारेपाट श्री 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उद्धाटन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शरद म्हात्रे, प्रतिकेश पाटील (बबल्या) गणेश पाटील, सुनिल भोईर आदींनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक खारेपाट श्री खुला गट विजेता संजय उले डी वाईन्स जिम अलिबाग यांनी पटकाविला. तर द्वितीय क्रमांक खारेपाट मेन फिजिक्स विजेता बॉबी पाटील रावे जिम पेण यांने तर तृतीय क्रमांक खारेपाट ग्रामीण विजेता सुयश अरविंद पाटील जय हनुमान बेलपाडा जिम विजेता ठरला. स्पर्धेला जिल्हा परिषद सदस्य. माजी जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, बीडीओ डी. एल. सालावकर, माजी सभापती प्रकाश पाटी, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, रेवसचे उपसरपंच दीपक पाटील, रेवस ग्रा.पं.चे सदस्य अजित पाटील आदी मान्यरांनी सदिच्छा भेट दिली.

Exit mobile version