| रसायनी | वार्ताहर |
मावळ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे मतदान 13 मे रोजी होणार असल्याने गावभेठी, आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा रसायनी पाताळगंगा परिसरातील वडगाव विभागातील गावांना भेट दिली व नागरिकांशी संवादही साधला. भर उन्हात कसलीही पर्वा न करता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा गावभेटी दौरा पाहून लोकसभा निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशा चर्चां नागरिकांतून ऐकावयास मिळाल्या. सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळण्याचा संजोग वाघेरे-पाटील यांचा स्वभाव असल्यामुळे जनतेला त्यांचा स्वभाव भावतो. आपला हक्काचा माणूस आपल्याला येऊन भेटून व आपले प्रश्न जाणून घेत असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्याचे वातावरण तयार झाल्याचे दिसून येते. या दौऱ्याला तुपगाव येथून सुरुवात होवून सारंग, आसरोटी, टेंभरी, वयाला, वडगाव, वाशिवली, बोरिवली, कैरे, वाणिवली, तळवली, लोहोप, कोपरी, इसांबे, आंबवली, माजगाव, वारद, पौंध, आसरे, नडोदे, निगडोली, माडप, खरसुंडी, कुंभीवली, वडवल, तांबाटी, खिरकींडी, डोणवत, गोरठण, वणवठे, सावरोली व धामणी आदी गावांना भेटी देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णा पारंगे, उत्तम भोईर, वासांबे विभागप्रमुख शशिकांत मुकादम, विभागीय संपर्कप्रमुख अनिल पिंगळे, माजी सरपंच गौरी गडगे, अशोक मुंढे, विधानसभा महिला संघटक प्रिती कडव, तालुका महिला संघटक चित्रा मैदर्गींकर, महिला विभागप्रमुख सदगुणा पाटील आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजोग वाघेरे-पाटील यांची प्रचारात आघाडी
