। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे रहिवासी सामाजिक संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ, जय हरी महिला मंडळ आयोजित मराठी नवं वर्ष व गुढीपाढवानिमित्त काढलेल्या शोभा यात्रेत मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी कामोठे वासियांनी संजोग वाघेरे याना उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. अनेकांनी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे नेते सूरदास गोवारी, माजी नगरसेवक प्रमोद भगत आदीजण उपस्थित होते.






