| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले वाशी हवेली हे गाव गेल्या काही वर्षांत स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि डिजिटल प्रशासनातील उल्लेखनीय कार्यामुळे राज्यासह राष्ट्रीय पातळीवर विशेषत्वाने झळकले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण विभागीय संत गाडगे महाराज अभियान समितीच्या मान्यवर पथकाने वाशी हवेली ग्रामपंचायतीला भेट देत गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. समितीने गावातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक कौतुक केले. मान्यवरांमध्ये प्रमुख उपस्थिती प्रदीप घोरपडे सहाय्यक आयुक्त, कोकण भवन, गणेश गांधळे लघुलेखक कोकण भवन, जयवंत गायकवाड जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग, दत्ता नाईक, रविकिरण गायकवाड,माजी सरपंच जगन्नाथ तांडेल यांसह पंचायत समिती तळा, तसेच विविध समाजबंधुत्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी हवेली ग्रामपंचायतीला संत गाडगे महाराज समितीची भेट
