| माणगाव | वार्ताहर |
माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव मारुती पवार यांना अविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाजभुषण पुरस्कार 2024 हा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. याची माहिती निवड पत्र पाठवून फाऊंडेशनचे संस्थापक संजय पवार व शंकर शिंदे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि.5) सकाळी 10:30 वा.शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर याठिकाणी होणार्या भव्यदिव्य कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. यावेळी विवेक ढेपे, कैलास पवार, सचिन देसाई, मजिद हाजिते, अरुण क्षीरसागर, भालचंद्र खाडे, प्रा. हर्षल जोशी, प्रा.विजय पाईकराव, रामदास गाडे, अजित शेडगे, सचिन पेनसे, बाळा पवार आदी उपस्थित होते.