| रायगड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील श्री विठ्ठल मंदिर येथे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने बुधवारी सकाळी अकरा वाजता विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. संत तुकाराम ग्रंथाचे वाचन करून भाविकांना प्रत्येक ओळींचा अर्थ सांगण्यात आला. दुपारी बारानंतर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर महाआरती घेण्यात आली. यावेळी मंदिर व्यवस्थापक दीनानाथ गुरुजी व त्यांच्या सहकार्याने सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.