। खोपोली । वार्ताहर ।
खालापूर नगरपंचायतच्या उपनगराध्यपदी शेकापचे संतोष जंगम यांची मंगळवारी (दि.15) बिनविरोध निवड झाली. खालापूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 8, शेकाप 7 तर राष्ट्रवादी 2 जांगावर विजयी होते. राज्यात सत्तांतरानंतर आ.महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवत शेकाप आणि शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) एकत्र येत शेकापचे संतोष जंगम यांना उपनगराध्यपदी विराजमान केले.
उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांना शुभेच्छा देण्यासाठी आ.महेंद्र थोरवे, शेकापचे जिल्हा सरचिटणीस अॅड. आस्वाद पाटील, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, उल्हासराव भुर्के, शेकाप जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, ज्येष्ठ नेते विलास थोरवे, तालुका चिटणीस संदीप पाटील, शहर चिटणीस अविनाश तावडे, खालापूर नगराध्यक्षा रोशनी मोडवे, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, माजी उपनगराध्यक्ष राजेश पारठे, खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक मोहन औसरमल, कुलदीप शेंडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, उद्योजक विक्रम पाटील, शेकापचे शहर खजिनदार जयवंत पाठक, शिंदे गटाचे खोपोली शहराध्यक्ष संदीप पाटील, राजू गायकवाड, संपर्क प्रमुख हरेश काळे यांच्यासह शेकाप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.