| कर्जत | प्रतिनिधी |
नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा आज शुक्रवार (दि.16) कर्जत नगरपरिषद सभागृह येथे पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण उपस्थित होते. यावेळी कर्जत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतोष पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे संतोष पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी संतोष पाटील बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. या सभेस अरुणा वायकर, किशोर कदम, कोयल कन्हेरीकर संकेत भासे, अंजली कडू, सुमिता गायकवाड, महेंद्र चंदन, राधिका पवार, विजय हजारे, सुवर्णा जोशी, प्रशांत पाटील, वैभव सुरावकर, नेहा शिंदे, रामदास गायकवाड, सुचिता खोत, कुमेश मोरे, जान्हवी देवघरे, हर्षाली गायकवाड, अशोक राऊत, मानसी कानिटकर नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. पाटील यांची बिनविरोध निवड होताच उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, रंजना धुळे तसेच कार्यकर्त्यांनी संतोष पाटील यांचे अभिनंदन केले.
उपनगराध्यक्षपदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड
