। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा विभागातर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या. यावेळी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्रा.डॉ. ओमकार पोटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र पाटील व प्रा. पल्लवी पाटील यांसमवेत महाविद्यालयाचे सर्व विभागीय प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, संयुक्ता हुजरेचे आई-वडील व महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी मोठया संख्येने उपस्थित होते.
विदयार्थीनी संयुक्ता हुजरे हिच्या हस्ते एन.एस.एस ध्वजारोहण करण्यात आले. 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या मुख्य परेड करिता तिची रायगड जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती. संयुक्ता हुजरे हिचा सन्मान सोहळा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून हुजरे हिस पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन ऋतुजा गायकवाड यांनी केले.