शनिवारी सप्तपदी नाटकाचे सादरीकरण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

अलिबागमधील मेघा चित्रमंदिरात प्रयोग

| अलिबाग | वार्ताहर |

मुंबईतील दोन हाऊसफुल्ल प्रयोगांच्या सादरीकरणानंतर थेट अलिबागमधील मेघा चित्रमंदिरात शनिवार, दि. 21 जून रोजी संध्याकाळी सात वाजता दोन अंक सप्तपदी या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

अद्वैत प्रॉडक्शन, क्लब 38 ची निमित्ती असणाऱ्या या नाटकात मुख्य भूमिकेत प्रियांका जाधव आणि अनिकेत खेडेकर असून, सहकलाकार म्हणून ओंकार देसाई आपली कला सादर करणार आहेत. या नाटकामध्ये बाल कलाकार- अगस्त्य अस्मिता पाटील, अन्वी आदित्य घाडगे, कलाकार- विक्रांत पवार, श्रावणी, सानिका, चेतन, रूपाली, राहुल, उमेश, प्रियांका (आत्या), दिव्यांका, वेदांत, सुवर्णा, निविदा, विशाल, श्रेया, रोहित, सूरज, गजानन, मनस्वी, राम, पुष्पा यांच्या भूमिका असणार आहेत. या नाटकादरम्यान मुख्य अतिथी म्हणून अभिनेता योगेश पवार, अभिनेत्री अंकिता राऊत, नलिनी मुंबई, प्रकाश सप्रे, मीना घाडगे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी, सात वचनाची जाणीव करुन देणारे आणि सर्वांना हसवणारे असे हे सप्तपदी नाटक मेघा चित्रमंदिरात येऊ पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version