सारस्वत बँकेची टॅगिटसोबत भागीदारी

| मुंबई | प्रतिनिधी |

सारस्वत बँकेने आपल्या रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना विविध डिजीटल बँकींग सुविधा पुरविण्यासाठी बँकींग क्षेत्रात डिजीटल पर्याय आणि सुविधा पुरवण्यात आघाडीची कंपनी असलेल्या टॅगिटबरोबर करार केला आहे.

सारस्वत बँकेने आपले क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. बँकेने मार्च 2022 अखेरीस एकूण 71 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून 275.02 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. बँकेचे निष्क्रीय मालमत्ता मूल्य(एनएव्ही) सर्वाधिक अल्प म्हणजेच 0.65 टक्के इतके असून व्यवसायाची मजबूत स्थिती त्यातून दिसून येते.

मोबीक्स डिजीटल बँकींग मंचामुळे नवीन डिजीटल सेवा सुरु करण्याच्या बँकेच्या क्षमतेला वेग मिळणार असून त्यामुळे सतत नाविन्यपुर्ण आणि अधिकाधिक सेवा सुरु करत ग्राहकांची संख्या वाढविता येणार आहे. नवीन डिजीटल सेवांमुळे अधिकाधिक डिजीटल चॅनल्सचा वापर करण्याचा बँकेच्या ग्राहकांचा वेग वाढणार असून त्यामुळे बँकेला स्पर्धेला तोंड देता येईल आणि बाजारपेठेतील आपला हिस्सा देखील वाढविता येणार आहे. मोबिक्सचा वापर करत सुरक्षित आणि कोठूनही, चोवीस तास व्यापक डिजीटल सेवा पुरवत आपल्या ग्राहकांचा अनुभव बँकेला उंचावता येणार आहे. भारतीय बाजारातील यशस्वी कामगिरी आणि डिजीटल बँकींग मंचावर सवोत्तम पर्याय यामुळे बँकेने टॅगिटची निवड केली आहे.

Exit mobile version