| अलिबाग | प्रतिनिधी |
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची 296 वी पुण्यतिथी अलिबागमध्ये साजरी करण्यात आली. भारतीय नौसेने तर्फे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
तसेच, गाज फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि आरसीएफ लिमिटेडच्या सक्रिय सहयोगाने परिसरातील दहावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी आरसीएफच्या कम्युनिटी सेंटरमध्ये मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारतीय नौसेना पोत आंग्रेचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर दीपक सिंघल यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी नौसेनेतील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गाज फाऊंडेशनचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, उपाध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, अभिजीत आयरे यांच्यासह इतर ट्रस्टी, शिक्षक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सागरी सीमा मंच व जेएसएम महाविद्यालयातील एनसीसी पथक यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला परिसरातील 927 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला.







