| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, ३ ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
तालुक्यातील १० ग्रामपंचायती साठी रविवारी ( दि. १८ ) निवडणूक पार पडली होती. थेट सरपंच पदा साठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. २० )जाहीर करण्यात आला. ज्या मध्ये ३ ठिकाणी शेकाप मित्र पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, एका ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला तर पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले.
भाजपचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार
- भाताण : पाटील तानाजी लक्ष्मण (658)
- शिवकर : आनंद दत्तात्रेय ढवळे (1138)
- दिघाटी : ठाकूर रजनी हिरामण (556)
- नेरा : प्रकाश गोपाळ घाडगे (1,570)
- करंजाडे : मंगेश शेलार
महाविकास आघाडी सरपंचपदाचे विजयी उमेदवार
- कानपोळी :- मधन धोंडीराम मते (470)
- शिरढोण : वैशाली भोईर (1,505)
ठाकरे शिवसेना गटाचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी
- नितळस : पाटील निकिता संदीप (802)
अपक्ष सरपंचपदाचे विजयी उमेदवार
- चिध्रण : पाटील एकनाथ नामदेव (1163)