पनवेल | वार्ताहर |
शिवकर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी सरपंचांसह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
उपोषणकर्त्यांच्यांकडून गावठाण विस्तार,सिडको/नैना प्रकल्प रद्द करणे, वनखाते, गुरचरण, जमीन, शेतघरातील घरांची बांधकामे नियमित करणे, रेडिरेकनर चा कमी केलेला दर पुर्ववत करणे व ग्रामपंचायतीचे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार व इतर सर्व अधिकार काढलेले आहेत ते पुन्हा नियमित करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आमरण उपोषणास सरपंच अनिल ढवळे, ग्रामस्थ श्री नरेश भगत,श्री सखाराम पाटील व कु.निकिता पाटील बसलेले आहे त्यावेळी 95 गाव नवी मुंबई ,नैना ,व प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष ड.श्री सुरेश ठाकूर साहेब,ड.श्री रामचंन्द्र वाघमारे ,श्री सुरेश पवार ,श्री सुधाकर लाड पत्रकार ,श्री रमेश म्हात्रे सर श्री बळीराम भोपी ,श्री एकनाथ पाटील व शेतकरी व ग्रामस्थ शिवकर उपस्थित होते