| मुरूड । प्रतिनिधी ।
मुरूड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील निलेश घराणे यांच्या घरात आलेल्या एकफुटी नागाला सर्पमित्र संदीप घरतने पकडून जिवदान दिले आहे.
घराणे यांच्या घरात दुपारच्या सुमारास जेवून झोपलेल्या त्याच्या आईच्या हातावरुन हा नाग जात असताना काही तरी गिलगीत लागल्याने दचकून जागी झाली. त्यावेळी या नागाला पाहून आरडाओरडा केला. या आवाजाने निलेशने धावत जाऊन पाहिले तर नाग असल्याचे दिसून आले. त्यावेळी तात्काळ सर्पमित्र घरत यांना कळविले. त्यांनी या नागाला सुखरूप पकडून वनखात्याच्या सहाय्याने जंगलात जाऊन सोडून दिले.