यंदाही मुलींची सरशी

बारावीच्या परीक्षेचा रायगड जिल्हयातील निकाल 94.83

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.21) दुपारी एक वाजता जाहीर झाला. रायगड जिल्ह्याचा निकाल 94.83 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत 97. 01 टक्के मुली व 92.71 टक्के मुले उतीर्ण झाले आहेत. यंदाही या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी निकालाच्या प्रमाणात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फेब्रुवारी – मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात परीक्षा संपल्यावर निकालाची प्रतिक्षा लागून राहिली होती. परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली. मंगळवारी दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. काही विद्यार्थ्यांनी मोबाईलवरून तर काहींनी सायबर कॅफेमध्ये जाऊन बारावीचा निकाल पाहिला. काही सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती. उतीर्ण झाल्यावर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. परीक्षेत उतीर्ण झाल्यावर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रायगड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत 29 हजार 346 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 27 हजार 831 विद्यार्थी उतीर्ण झाले. त्यात 14 हजार 53 मुली व 13 हजार 778 मुलांचा समावेश आहे. जिल्ह्याचा निकाल 94.83 टक्के लागला आहे. त्यात मुले 92.71 टक्के व मुली 97.01 टक्के उतीर्ण झाले. यंदादेखील मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

76.25 टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण
रायगड जिल्ह्यातील 2 हजार 667 पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील 2 हजार 632 विद्यार्थी परिक्षेला सामेरे गेले. त्यापैकी 2 हजार 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 625 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 76.25 टक्के इतके आहे.

जे विद्यार्थी बारावी परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता जोमाने अभ्यास करावा व पुढील परीक्षेत यश संपादित करावे. बारावी नंतर करिअरच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्या दृष्टीने पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी.

डॉ. भरत बास्टेवाड

मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.
जिल्ह्यातील निकालावर दृष्टीक्षेप

तालुकेमुलेमुलीएकूण टक्केवारी
पनवेल96.9898.7297.82
उरण89.4197.2893.22
कर्जत91.9796.4794.20
खालापूर85.6194.9490.3
सुधागड80.9588.3284.38
पेण87.1094.3690.94
अलिबाग90.1796.4293.32
मुरूड81.9497.1490.52
रोहा93.8596.5795.22
माणगांव97.1299.2898.25
तळा95.9510097.86
श्रीवर्धन94.3697.5595.98
म्हसळा97.5610098.68
महाड89.7794.2592.03
पोलादपूर89.1191.7990.39
एकूण92.7197.0194.83

रायगड जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला आहे. जिल्ह्यातील मुलींनी चांगली टक्केवारी काढून जिल्ह्याचे नाव लौकीक केले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मुली बारावीच्या परीक्षेत सरशी ठरल्या आहेत. उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जे विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत, त्यांनी खचून न जाता पुन्हा अभ्यास करून परीक्षेत उतीर्ण होण्याचा प्रयत्न करावा. या विद्यार्थ्यांनादेखील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

पंडित पाटील
माजी आमदार


Exit mobile version