| माणगाव | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचा येथील सातबारा पक्का असून या तिन्ही वार्डांतील सर्वकंष पद्धतीची विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत झाली असल्याचे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी दत्त नगर माणगाव येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले. माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वार्ड क्र.1 च्या उमेदवार लक्ष्मी जाधव,वार्ड क्र.2 च्या उमेदवार सुविधा खैरे ,वार्ड क्र.11 चे उमेदवार साहिल गायकवाड यांच्या प्रचारार्थ खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दत्तनगर माणगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.सदर सभेत खा.सुनील तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सभेला तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष केकाणे,माणगाव पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर,माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव,माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,संदीप खरंगटे,दिलीप जाधव,उमेदवार लक्ष्मी जाधव,सुविधा खैरे,साहिल गायकवाड ,माजी नगरसेविका रिया उभारे, माजी नगरसेवक जयंत बोडेरे,उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के,शशिकांत मोहिते,सौरभ चांदोरकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना खा.तटकरे पुढे म्हणाले लक्ष्मीच्या नावातच लक्ष्मी असल्याने मतदार निश्चितच आमच्या पाठीशी राहतील.सुविधा आमची उमेदवार असून साहिल सारखा तरुण उमेदवार आमचा आहे.गेल्या 25 ते 30 वर्षात विविध विकासाची कामे याभागात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत केली आहेत.
मागच्या माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत या तिन्ही वार्डांतून राष्ट्रवादीचे नगरसेवक,नगरसेविका आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आल्या होत्या.या तिन्ही वार्डांतील विकासकामे करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रामाणिक प्रयत्न केला असून उर्वरित विकासकामे पुढील काळात केली जातील असेही त्यांनी आश्वासित करून या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन केले.यावेळी माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांनी या वार्डांतून रत्नाकर उभारे ,रिया उभारे,दिलीप जाधव यांच्या प्रयत्नांतून अनेक विकासकामे मार्गी लागली असल्याचा उल्लेख करीत राष्ट्रवादी पक्षातून दुसर्या पक्षात गेलेले नितीन दसवते यांच्यावर जोरदार टिका केली.







