| अलिबाग | प्रतिनिधी |
सत्य साईबाबांचा जन्म शताब्दी महोत्सव अर्थात 100 वा वाढदिवस रविवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी भारतात व जगातील बहुतेक देशात, तसेच त्यांच्या जन्मस्थळी पुट्टपर्ती आंध्रप्रदेश येथे मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. त्यानिमित्त अलिबाग तालुक्यातील नागाव येथील प्रशांती निवास, धोबन तळ्यासमोर खारगल्ली-नागाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल.
सकाळी 5 वा. ओंमकारम् सुप्रभातम् 5.15 वा. नगरसंकिर्तन, 6.30 वा. जन्म उत्सव व 7.15 वाजेपर्यंत भजन व आरती नंतर दर्शन, 7.30 ते 8.50 प्रसाद वितरण, नास्ता व चहा-कॉफी 9 वा. श्री साई नेत्रालयाचे उद्घाटन त्यानंतर ठिक 11.00 ते दुपारी 1.30 दरम्यान सिव्हील हॉस्पीटल अलिबाग, मुकबधीर विद्यालय व श्री समर्थ वृध्दाश्रम, परहुरपाडा येथे नारायण सेवा (अन्नदान) त्यानंतर रात्रौ 8.00 वा. आरती व प्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता. तसेच गणपती पाडा थेरोंडा येथे सायंकाळी 6.30 ते 9.30 वा. जन्म सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
सत्य साईबाबांच्या जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त आपल्या पंचक्रोशीतील गरजू नागरिकांसाठी डोळ्यासंबंधित उपचार/मोती बिंदू/काच बिंदू यांचे मोफत ऑपरेशन कसल्याही प्रकारचे शुल्क न आकारता एकदम मोफत करण्या करीता मान्यवरांचे हस्ते श्री साई नेत्रालय ओ.पी.डी. युनिटचे शुभारंभ, प्रशांती निवास धोबन तळ्यासमोर खारगल्ली-नागांव येथे रविवार दि. 23 नोव्हेंबर रोजी ठिक 9.00 वा. होणार आहे
डोळ्यांसंबंधित उपचाराकरिता पेशंटचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. ते शनिवार दि.22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते 3 यावेळेत प्रशांती निवास येथे करता येईल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार व रेशन कार्डची झेरॉक्स कॉपी आणणे अनिवार्य आहे, त्या शिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही याची पेशन्टने दखल घ्यावी, असे सुरेश मेहरे यांनी सांगितले आहे.







