युवकांना पोलीस प्रशिक्षण दिल्याचे समाधान

सोमनाथ घार्गे यांचे प्रतिपादन
। मुंबई । दिलीप जाधव ।
महाराष्ट्राच्या पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या तरुणांना मुंबईतल्या मरोळ प्रशिक्षण केंद्रातील माझ्या कारकिर्दीत त्यांना घड़वून पाठवले ही माझ्या करीता समाधानाची बाब आहे, अशा भावना रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केल्या. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले घागें यांनी आपल्या पोलीस सेवेची सुरुवात गड़चिरोली जिल्हयातून केली . त्यानंतर अमरावती,अकोला,औरंगाबाद,मुंबई वाहतुक शाखा,मुंबईतल्या परिमंडळ 12 चे उपायुक्त अशी भरीव कामगिरी त्यांनी पोलीस दलात केली आहे.

पोलीस दलाच्या सेवेत दर 3 वर्षाने अधिकारी असो वा पोलीस शिपाई त्यांची बदली हा सेवेतला अपरिहार्य नियम आहे.त्यातच पोलीस अधिकार्याला राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपली सेवा ही द्यावीच लागते यांनी मुंबईतल्या पोलीस प्रशक्षिण केंद्रात 3 वर्षे सेवा पूर्ण झाल्या नंतर आपल्या वरिष्ठांना त्याच ठिकाणी 1 वर्षाची मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली .त्यावेळी त्यांच्या वरिष्ठांनीआश्‍चर्य व्यक्त केले. रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे . जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था , महिलां वरील अत्याचार,वाळू माफिया,सरकारी अथवा खाजगी जमिनीवर अतिक्रमण करणारे माफिया यांचे आव्हान सोमनाथ घागें यांच्या पुढे असणार आहे . मात्र त्यांचा पोलीस सेवेतील प्रदीर्घ अनुभव पाहता ते या माफियांचा नक्कीच बिमोड करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही .

Exit mobile version