बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिराग जोडीअजिंक्य

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारताची अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी रविवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावताना संस्मरणीय कामगिरी केली. सात्विक-चिराग जोडीने ली हुए-यांग सुआन या चीन तैपईच्या जोडीवर सरळ दोन (21-11, 21-17) विजय मिळवला.

भारताच्या या जोडीला मागील तीन स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, पण यंदा त्यांनी अंतिम फेरीचा अडथळा लीलया ओलांडला. फ्रेंच ओपन स्पर्धा त्यांनी दुसऱ्यांदा जिंकली. सात्विक-चिराग व ली-सुआन या जोडीमध्ये पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 4-4 अशी बरोबरी झाली. त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चुकांचा फायदा घेत भारतीय जोडीने सलग पाच गुण मिळवत 9-4 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीयांच्या झंझावातासमोर चीनच्या खेळाडूंचा निभाव लागला नाही. 15-8 अशी आघाडी मिळवताना भारतीयांनी दमदार कामगिरी केली. पहिला गेम 21-11 असा अवघ्या 15 मिनिटांत त्यांनी जिंकला.

Exit mobile version