सात्विक-चिरागचे सर्वस्व पणाला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरीतील जोडीवर उद्यापासून सुरू होत असलेल्या इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजमध्ये भारताची मदार असणार आहे. सात्विक-चिराग जोडीला जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. पॅरिस ऑलिंपिकदृष्टीने ही स्पर्धा सात्विक-चिराग जोडीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने यंदाच्या मोसमात चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी दोन स्पर्धा जिंकण्यात या जोडीला यश लाभले आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी हीच जोडी प्रबळ दावेदार समजली जात आहे. त्याआधी इंडोनेशिया स्पर्धेत दमदार कामगिरी करीत या जोडीला आत्मविश्वास कमवावा लागणार आहे.

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचा कस लागणार आहे. तसेच, पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणोय, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत या खेळाडूंकडे ऑलिंपिकची तयारी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, तनीषा क्रॅस्टो-अश्विनी पोन्नाप्पा, ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोड्यांवर महिला दुहेरीची मदार अवलंबून असणार आहे.

Exit mobile version