। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कुमार-मुली गटाच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा शेवगाव (जि. अहमदनगर) येथे पार पडल्या. या स्पर्धेतून 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान भुवनेश्वर, ओडीसा येथे होणार्या 40 व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारा संघ निवडण्यात आला. महाराष्ट्र खो-खो संघाच्या कर्णधारपदी सांगलीचा सौरभ आहिर (कुमार) व उस्मानाबादच्या गौरी शिंदे (मुली) यांची निवड झाली आहे व त्याची घोषणा संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी केली. या संघाचे सराव शिबिर 10 सप्टेंबर पासून शेवगाव येथे सुरू होईल. सध्या सुरू असलेली कोविड परिस्थिती पाहता महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने प्रथमच डॉ. किरण वाघ यांची फीजिओथेरोपिस्ट म्हणून निवड केली असून ते या संघाबरोबर जाणार असल्याची घोषणा संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी केली. त्याच बरोबर संघाबरोबर आणखी एक विशेष प्रशिक्षक पाठवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सौरभ व गौरी महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार
