नदीपात्रात अडकलेल्या कुत्र्यांना जीवदान

। कोलाड । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील संभे ते पाले खुर्द गावच्या हद्दीतील कुंडलिका नदी पात्राच्या मधोमध असणार्‍या कातळावर चार कुत्रे गेले होते. यानंतर अचानक पाणी वाढल्याने हे चार कुत्रे या नदीच्या पात्रता अडकले.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 29) पहाटे संभे ते पाले खुर्द दरम्यान कुंडलिका नदी पात्रात चार कुत्रे अडकले असून त्यांना बाहेर येत नसल्याचे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ टीमला संपर्क केला. माहिती मिळताच त्वरित सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोहचली. पाण्याचा तीव्र वेग असल्यामुळे त्यांनी कयाक बोर्डाचा उपयोग करून चारही कुत्र्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. कुत्र्याचे प्राण वाचविण्यासाठी सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सागर दहिंबेकर, प्रयाग बामुगडे, सुभम सणस, प्रणय शिंदे, विक्रांत कोंगले, विजया मगर, श्रावणी भोई, कृतिका वारंगे यांनी अपार मेहनत घेतली.

Exit mobile version