विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील महालगुर आडाचीवाडी येथील एका विहरीत गाय पडल्याची घटना घडली होती. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर या गाईला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. आडाचीवाडी येथील विहिरीत कचरा पडून नये म्हणून ती हिरव्या रंगाच्या जाळीने झाकण्यात आली होती. येथील माजी सरपंच विलास उतेकर यांच्या मालकीची गाय शनिवारी (दि.2) सकाळच्या सुमारास या विहरीजवळ आली. त्या गायील हिरव्या जाळीचा अंदाज न आल्याने तिने त्यावर उडी मारली. उडी मारताच ती गाय सुमारे 50 फुट खोल विहरीत कोसळली. सुदैवाने या विहरीत पाणी असल्यामुळे ती पाण्यावर आपटून तरंगत राहिली. हि बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या गाईला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि गाईला सुखरूप बाहेर काढले.

Exit mobile version