| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तहसील कार्यालयामागील व दुय्यम निबंधक कार्यालयालगत एक गाय जखमी अवस्थेत विव्हळत होती. हे दुय्यम निबंधक कार्यालयातील सह दुय्यम निबंधक महेश आर्डे व रतिष जमादार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर फलेभाई यांना सांगितले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहरातील पशुवैद्यकीय कार्यालयात जाऊन माहिती दिली असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गायीला औषधोपचार करून जीवदान देण्यात आले. महेश आर्डे व रतिष जमादार यांच्या तत्परतेमुळे गायीला जीवदान मिळाल्याबद्दल प्राणीप्रेमींकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
जखमी गायीला जीवदान
