। नागोठणे । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद व रोहा पंचायत समितीच्या विद्यमाने शासनाच्या विविध योजनांची माहिती महिला वर्गाला मिळावी, या उद्देशाने नागोठणे येथे महिला बचतगट व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ.रवि पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या रोहेकर तर प्रास्ताविक महारुद्र फडतडे तसेच आभार प्रदर्शन अशोक दांडेकर यांनी केले. यावेळी पल्लवी जोशी, मारुती देवरे, श्रेया कुंटे, सचिन मोदी आदींनी मार्गदर्शन केले.