| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील राजिप विकास कॉलनी शाळेत शनिवारी (दि.3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी उतेखाल केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे उपस्थित होते. यावेळी इ. 1ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, इ. 4 थीमधील विद्यार्थीनी स्वरा मसुरे हिने ‘मी सावित्री बोलते’ ही एकांकिका सादर केली. केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी विदयार्थ्यांना सावित्रीबाईच्या जीवनावर मार्गदर्शन केले व त्यांचा आदर्श सर्वांनी आचरणात आणावा, या विषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा येलवे व उपशिक्षिका निलम गायकवाड यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.







